त्रिंबक/ विवेक परब : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरन सी. एस्. आर निधीतून, जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरजू मुलींना आज त्रिंबक हायस्कूल येथे चिंदर आणि पळसंब अशा दहा मुलींना परिवर्तन केंद्र जिल्हा समन्वयक विलासजी हडकर यांच्या हस्ते मोफत सायकल वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रशालेचे शिक्षक एकनाथ गायकवाड यांनी केले तर परिवर्तन केंद्र जिल्हा समन्वयक विलास हडकर यांनी मुलांना सायकल बँक संकल्पना, बौद्धिक, शारीरिक विकास, लोप पावत चाललेली संस्कृती या बाबत बहुमोल मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव सुरेंद्र (अन्ना) सकपाळ यांनी मार्गदर्शन करताना रोडावत चालली विद्यार्थ्यांची संख्या, ग्रामीण भागात संस्था चालवताना असणारी आव्हाने या बाबत खंत व्यक्त केली, कार्यक्रमाचा समारोप शिक्षक वारंग यांनी केले.
यावेळी समिर बांवकर, संतोष गांवकर, चिंदर उपसंरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, पळसंब उपसरपंच सुहास सावंत, प्रशालेचे शिक्षक वारंग, धुरे,पवार, विनायक मसुरकर, गिरीश पवार, रवी पवार तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.