कणकवली शिवसैनिक व पोलिसांमध्ये झटापट
कणकवली | उमेश परब : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. यामध्ये काही काळ दंगल नियंत्रण पथक , पोलीस आणि शिवसैनिक यांच्यामध्ये झटापट झाली. काल नारायण राणे यांनी केलेल्या व्यक्तव्यचा निषेध म्हणून हे कृत्य केले. नारायण राणे यांना अटक करावी अशी मागणी तसेच नारायण राणे यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी शिवसैनिकांनी देत शिवसैनिकांच्या वतीने नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न शिवसेना कार्यकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
या घटनेमुळे कणकवली तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये ठीकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे