केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्पष्टीकरण
जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहण्याचे दिले संकेत
चिपळूण | ब्यूरो न्युज : मी नॉर्मल माणूस वाटलो काय… वरती सरकार आमचं आहे, असे सांगत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी, मी कोणत्याही पद्धतीचे चिथावणीखोर भाष्य केलेले नाही, मी कोणाला भीत नाही, माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे मला माहीत नाही, मी शिवसेनेला भीक घालत नाही, जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहणार आहे. असे स्पष्ट केले आहे. शिवसेनेत आता खरे शिवसैनिक राहिले नाहीत .
दरम्यान मी केंद्रीय मंत्री आहे मला अटक करण्याचे आदेश द्यायला आयुक्त राष्ट्रपती आहेत की पंतप्रधान आहे असा सवाल करत आमची कार्यालये कोण फोडत असेल तर आम्ही सुध्दा त्याच पद्धतीने उत्तर देऊ .
देशाचा अमृतमहोत्सव ज्या मुख्यमंत्र्याला माहीत नाही तो देशद्रोही नाही का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत पत्रकारांना केला