उपसरपंच अमित साटम यांच्या हस्ते शुभारंभ ; २०१ जणांनी घेतला लाभ
शिरगाव / संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव-चौकवाडी येथे शिरगाव-शेवरे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित साटम यांच्या हस्ते कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
शिरगाव प्रा.आ.केंद्रापासून चौकवाडी हे सुमारे ६ कि. मी.अंतरावर आहे.कोरोनाकाळात एसटी सेवा बंद असल्यामुळे येथील ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सोसून रिक्षा किव्हा खाजगी वाहनाने लसीकरणासाठी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत असे.त्यामुळे चौकवाडी येथे लसीकरण केंद्र व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी होती.त्यानुसार भाजप युवा मोर्चाचे देवगड तालुकाध्यक्ष तसेच शिरगाव-शेवरे ग्रुप ग्रा.प.चे उपसरपंच अमित साटम यांनी पाठपुरावा केल्याने चौकेवाडी येथे हे लसीकरण केंद्र सुरू झाले.यासाठी लागणारी इंटरनेट सुविधा शशिकांत चौकेकर यांनी उपलब्ध करून दिली.
यावेळी ग्रा.प.सदस्य राजेंद्र शेट्ये, संतोषकुमार फाटक,मयुरी चौकेकर, माजी सरपंच उषा चौकेकर, सुजित चौकेकर, शशिकांत चौकेकर, सुरेश चौकेकर, महेश चौकेकर, धोंडीराम चौकेकर, राकेश चौकेकर, वैदयकीय अधिकारी डॉ.वाय. एस.चव्हाण,आरोग्यसेविका मीरा राठोड,अपर्णा इंदप, आशा स्वयंसेविका सुखदा चौकेकर आदि उपस्थित होते. यावेळी सुमारे २०१ ग्रामस्थांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.ही सुविधा मिळाल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.