५० तालिबानी ठार ; अनेक बंदी
काबूल |ब्युरो न्यूज : अफगाणिस्तानच्या पंजशीर आणि बानू प्रांतामध्ये तालिबान धूळ चारली असून तालिबानच्या जिल्हाप्रमुखांसह ५० दहशतवादी ठार झाले असून अनेकजण गंभीर आहेत. फज परिसरात हे दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. तालिबानने मात्र या वृत्ताचा इन्कार दाखवला आहे.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवलेल्या तालिबानला पंजशीर प्रांतावर ताबा मिळवला आला नाही. पंजशीर प्रांतावर ताबा मिळवण्यासाठी तालिबानने मोहीम आखली आहे. तालिबानने आपले बंडखोर पंजशीरवर हल्ला करण्यास पाठवले आहेत. मात्र, पंजशीरमधील तालिबान विरोधकांनी त्यांना मोठा झटका दिला आहे.
पंजशीरमधील एका सापळ्यात तालिबानी अडकले.बागलाण जवळील अंदराब खोऱ्यात सापळा लावून बसलेल्या पंजशीरच्या फौजांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ५० तालिबानी ठार झाल्याचे समोर आले.