कोकण हायवे समन्वय समितीचे आयोजन
मसुरे | प्रतिनिधी : कोकण हायवे समन्वय समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव तिठा येथे ५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते ११ यावेळेत मानवी साखळी जन आंदोलन आणि ११ ते १२ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कोकण हायवे समन्वय समितीमधील सभासदांनी स्वतः आणि आपल्या संपर्कातील, गावातील,विविध सामाजिक संस्थेतील, जास्तीत जास्त लोकांना नांदगाव येथे जन आंदोलनासाठी स्वयंप्रेरणेने घेऊन येणे आणि हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन कोकण हायवे समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सदर आंदोलन श्री.सुरेश मोरये यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. तरी ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचे असेल किंवा नियोजनात योगदान द्यायचे असेल त्यांनी (७५८८४५०५८९) या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन
सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक उद्योजक डॉ. दीपक परब, उत्तम दळवी, अमित वेंगुर्लेकर यांनी केले आहे.