मालवण | वैभव माणगावकर :आज दिनांक १४/०८/२०२१ मालवण मधील वायरी लुडबेवाडी तर्फे येथे कै. दिप्ती प्रभाकर लुडबे हिच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी स्वखुशीने रक्तदान केले. शिबिराचे आयोजन हे तानाजी नाका वायरी येथील लोकनेते आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे करण्यात आले. त्यामध्ये ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
या शिबिरामध्ये बाबा परब, हरेश गांवकर, आप्पा लुडबे, आर. जी. चव्हाण, आप्पा चव्हाण,विक्रांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.