शिक्षक समिती मालवणचा उपक्रम
पोईप | ओंकार चव्हाण : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा मालवणच्यावतीने व साळेल कट्टा केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीकृष्ण सावंत यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्याने प्रायोजित तालुकास्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यास्पर्धेमध्ये बालकथाकथन ,हस्ताक्षर ,इयत्ता 5वी व 8वी मध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रम नुकताच केंद्रशाळा कट्टा नं 1 येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रम हा पोईप व कट्टा प्रभागतील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.सुमारे 49 विद्यार्थ्याना सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र ,व गुलाबपुष्प देऊन मान्यवराच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच हेरिटेज मिसेस इंडीया या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या शिक्षिका
भाग्यश्री वाडकर यांचा शिक्षक समितीच्यावतीने शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी शिक्षक समिती नेहमीच विविध उपक्रम राबवित आपली बांधिलकी ही विद्यार्थी हिताची व सामाजिक जाणिवेची असल्याचे सिद्ध करीत आली आहे.ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण यांनी शिक्षक समिती शिक्षक प्रश्नांसाठी जशी आक्रमक आहे तशी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुद्धा कटिबद्ध आहे असे सांगितले.
कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम ,मालवणचे तालुका अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, जेष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण,सचिव-श्री.नवनाथ भोळे व स्पर्धा प्रायोजक-श्रीकृष्ण सावंत जिल्हाउपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे ,वराडकर हायस्कूल कट्टाचे मुख्याद्यापक श्री. कांबळे सर,शिक्षक नेते मंगेश कांबळी,कार्याध्यक्ष रूपेश गरुड,पतपेढी संचालक राजेंद्रप्रसाद गाड,ज्येष्ठ सल्लागार अरुण गोसावी,जिल्हा संघटक प्रकाश झाडे आदी उपस्थित होते.
यावेळी कलाशिक्षक व अष्टपैलू कलाकार श्री.समीर चांदरकर यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.तसेच कार्यक्रमास स्पर्धा प्रमुख बाळकृष्ण नांदोसकर,संतोष नेरकर, भाग्यश्री वाडकर,सुयोग धामापूरकर,दिनेश ठाकूर,रेखा वंटे,कल्पना परब,सावली सुर्वे,सौ.गोसावी मॅडम, राजेंद्र गोसावी,तानाजी गावडे,मनोहर मालंडकर,प्रकाश पवार,अपर्णा माईणकर,हनुमंत आखाडे,प्रमोद राणे,प्रदीप सावंत,विकास घाडीगांवकर,दीपक गोसावी,मारुती चव्हाण,हे सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी पा़लक बहूसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रम निमित्ताने श्रीकृष्ण सावंत, बाळकृष्ण नांदोसकर, मंगेश कांबळी,समीर चांदरकर,चंद्रसेन पाताडे,भाग्यश्री वाडकर,मनोहर मालंडकर यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर यांनी,बहारदार असे सूत्रसंचालन दीपक गोसावी यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन सचिव नवनाथ भोळे यांनी केले.