मसुरे | प्रतिनिधी : वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल मधील दहावी मधून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सह खजिनदार अभिमन्यू कवठणकर यांच्या हस्ते संपन्न झाला. भंडारी कनिष्ठ विद्यालय मालवणची इयत्ता बारावी वाणिज्य शाखेची उत्तीर्ण विद्यार्थिनी कुमारी नितल भांडे ही तालुक्यामध्ये वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक पटकावून उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशालेची माजी विद्यार्थिनी असल्याने तिचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.पाटील सर,श्री.कुबल सर सौ.दळवी मॅडम,सौ.सनये मॅडम, श्रीम.केळूसकर मॅडम उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एमएसएफसी निदेशक यांनाही भेटवस्तू देऊन श्री कवठणकर यांनी सन्मानित केले.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -