मालवण । वैभव माणगावकर :-रोटरी क्लब, मालवणच्या वतीने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला आकर्षक कचराकुंडी देणगी म्हणून देण्यात आली. मालवण येथील डॉ. लिमये हॉस्पिटलच्या वतीने ही देणगी पुरस्कृत करण्यात आली आहे. रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष रोटेरियन उमेश सांगोडकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांच्या हस्ते या कचराकुंडीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य उज्वला सामंत यांनी रोटरी क्लब मालवणचे आभार मानले. यावेळी सुहास ओरसकर, रतन पांगे अभय कदम, महेश काळसेकर, डॉ. लीना लिमये, डॉ. अजित लिमये, इत्यादी रोटेरियन उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सुमेधा नाईक, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. एच. एम चौगले, प्रा. खोबरे, प्रा. खरात, प्रा. खोत, प्रा. पवार प्रा. हारगिले तसेच विद्यार्थी उपस्थित होते.