रेवंडी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलाय इशारा
मालवण | वैभव माणगावकर :- मालवण तालुक्यातील रेवंडी कालावल खाडी किनारी एका स्थानिक नागरिकाने कांदळवन तोडून व धुपप्रतिबंधक बंधारा बांधून मार्ग तयार केला आहे. याबाबत मालवण तहसीलदार, पतन व वनविभाग यांच्याकडे रेवंडी ग्रामपंचायतच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. धुपप्रतिबंधक बंधारा पुर्वरत करून खाडीत टाकलेला मातीचा भराव काढून टाकण्याबाबत प्रशासनाने आदेश देऊनही त्यावर अजून ५ महिने त्यावर अमलबजावणी का झाली नाही. तरी तात्काळ खाडीतील मातीचा अनधिकृत भराव हटविण्यात यावा. अन्यथा तेथीलच रेवंडी ग्रामस्थ १५ ऑगस्ट पासून उपोषण छेडतील. त्यावेळी ग्रामस्थांनी कायदा हातात घेतल्यास त्यास महसूल व पोलिस प्रशासन जबाबदार असेल. असा इशारा मालवण तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आले आहे.