महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
भाजपा जिल्हा कार्यालयाला देणार भेट.
मुंबई | ब्यूरो न्यूज : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे १३ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते महसूल विषयक लोकांच्या अडचणी समजून घेणार आहेत. तसेच प्रशासकीय बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

दौऱ्याची सुरुवात सकाळी ९.३० वाजता माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेटीने होईल. त्यानंतर, सकाळी १०.५५ वाजता त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होईल. सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत ते नागरिकांची निवेदने स्वीकारतील.
दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत महसूल बावनकुळे महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, तसेच भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेतील. त्यानंतर, दुपारी ३.१५ ते ४.१५ या वेळेत ते भाजपा जिल्हा कार्यालयाला भेट देणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)