मालवणमध्ये आज 'उत्तरचंद्राची कोजागिरी' अभिवाचन अनुभव कार्यक्रम.
मालवण | प्रतिनिधी : आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल निर्मित आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने 'उत्तरचंद्राची कोजागिरी' अभिवाचन अनुभव कार्यक्रम आज, ०३ ऑगस्ट रोजी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवणमध्ये सायंकाळी ५:०० ते ७:०० या वेळेत संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाची संकल्पना व संहिता लेखन ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांची असून या कार्यक्रमात आजी - वैशाली पंडित, आजोबा - संजय शिंदे, सूत्रधार - अक्षय सातार्डेकर, सहकलाकार - डॉ. सुमेधा नाईक व तालवाद्य - वैभव मांजरेकर या कलाकारांचा सहभाग आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल व बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)