ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार चेतन नरके यांनी घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची महत्वपूर्ण भेट…!

थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार चेतन नरके यांनी घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची महत्वपूर्ण भेट…!

प्रकाशन: 25 Oct 2021 12:59 PM
वाचन संख्या 83

थायलंड सरकार व तेथील उद्योजकांशी होणार सामंजस्य करार..

मुंबई | ब्युरो न्यूज : गोकुळ दूध संघाचे संचालक आणि थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार चेतन नरके यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि कोकण येथील पर्यटन व लघु आणि सूक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी संयुक्त उपक्रम राबवण्यावर चर्चा झाली.
तसेच येणाऱ्या आर्थिक वर्षात थायलंड सरकार आणि तेथील उद्योजकांत सामंजस्य करार करण्याचे ठरले. चेतन नरके यांना शासन आणि प्रशासकीय पातळीवर सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचे अभिवचन केंद्रीय मंत्री नारायण राणे दिले आणि त्याकरिता दिल्ली येथे येण्याचे आमंत्रण दिले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स