ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये विविध सांस्कृतीक कार्यक्रमांसह स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न .

रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये विविध सांस्कृतीक कार्यक्रमांसह स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न .

प्रकाशन: 15 Aug 2023 02:12 PM
वाचन संख्या 373

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल या प्रशालेत ७६ वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माजी नौदल अधिकारी श्री. राजेंद्र शिवराम वराडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन भारतीय तिरंगी झेंड्याला सलामी देण्यात आली. या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व राष्ट्रगीत तसेच राज्यगीताचे सादरीकरण करण्यात आले.

इयत्ता ३ री व ८ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका डायना डिसोज़ा यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका पेर्पेच्युअल फर्नांडिस यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स