वायंगणीत युवासेनेचे श्रमदान ; पटवाडी ते वायंगणी नाका मार्गावरील खड्ड्यांची केली डागडुजी.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा गांवा विभागातील वायंगणीच्या युवासेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष) ठाकरे कार्यकर्त्यांनी श्रमदानातून रस्त्याची डागडुजी केली. वायंगणी पटवाडी ते वायंगणी मुख्य नाका या मार्गावर असलेले खड्डे या ‘युवासेना वायंगणी’ च्या युवा सैनिकांनी बुजवले.
यावेळी वायंगणी सरपंच रुपेश पाटकर शिवसेना उपविभाग प्रमुख सचिन रेडकर, युवा सेना आचरा समन्वयक संकेत पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर (बाप्पा), युवा सेना कार्यकर्ते अर्जुन सावंत, रामदास सावंत, गणेश सावंत , विष्णू सावंत, प्रमोद सावंत, शुभम त्रिंबककर, निखिल पेडणेकर, रामदास सावंत, गणेश सावंत, दत्तात्रय सावंत, प्रशांत सावंत, वैभव सुर्वे, विशाल सावंत, अविष्कार सावंत अशा युवा सैनिकांनी श्रमदान उपक्रमात योगदान दिले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)