ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांची आणखीन एक अत्यावश्यक कामगिरी; भूविकास बॅन्केच्या कर्मचार्यांनी मानले आभार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांची आणखीन एक अत्यावश्यक कामगिरी; भूविकास बॅन्केच्या कर्मचार्यांनी मानले आभार.

प्रकाशन: 18 May 2023 05:17 PM
वाचन संख्या 90

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्र राज्यातील भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांचे ७ वर्षे थकीत असलेले पगार व इतर सर्व आर्थिक लाभाची रक्कम कमर्चाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने तसेच सातत्याने अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केल्याने आम्हाला न्याय मिळाला असल्याचे भूविकास बँकेचे कर्मचारी उत्तम राणे, चंद्रकांत सरंगले यांनी सांगितले.आज त्यांनी आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पगार व इतर देणी थकीत होती. आमदार वैभव नाईक यांनी भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्यातील भूविकास बँकांच्या मालमत्ता शासनास हस्तांतरीत करुन त्यापोटी भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्यांची देणी अदा करणेसाठी रक्कम उपलब्ध करुन द्यावी व सदर रक्कम भूविकास बँकांकडून शासनास येणे असलेल्या रक्कमेत समायोजित करण्याचे आदेश सहकार आयुक्तांना दिले होते.त्यानुसार कार्यवाही होऊन कर्मचाऱ्यांचा थकीत पगार, उपदान रक्कम , रजा पगार, भरपाई रक्कम,महागाई भत्ता अशी सर्व रक्कम कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७१ कर्मचाऱ्यांची १४ कोटी ५५ लाख २३ हजार एवढी रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स