ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने ‘स्नेहबंध ‘कार्यक्रमाचे आयोजन..
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने ‘स्नेहबंध ‘कार्यक्रमाचे आयोजन..

प्रकाशन: 08 Apr 2023 09:07 PM
वाचन संख्या 64

केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट,कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो ए.टी.एम चे होणार उदघाटन..

कणकवली/सहसंपादक नवलराज काळे: माननीय खासदार श्री नारायणरावजी राणे साहेब, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री भारत सरकार यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने स्नेहबंध’ कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता करण्यात आले आहे.वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट, कॉन्टॅक्टलेस कार्ड व मायक्रो ए.टी.एम चे उदघाटन सोहळा तसेच बँकेच्या आर्थिक वर्षात उल्लेखनिय काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव मा. खा. श्री. नारायणराव राणे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे.सदर ‘स्नेहबंध’ सोहळा कार्यक्रम आराध्या हॉटेल, झाराप झिरो पॉईन्ट, नेमळे ब्रिज जवळ, मुंबई गोवा महामार्ग, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय श्री. प्रमोदजी सावंत, मुख्यमंत्री गोवा राज्य, माननिय श्री. रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग, माननीय श्री. आनंदराव अडसुळ, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री. माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर, अध्यक्ष- गोवा बागायतदार संघ, माननीय सौ. नीलमताई राणे अध्यक्षा जिजाई महिला सेवा संस्था ओसरगांव, माननिय श्री. निलेश राणे, माजी खासदार, माननिय आमदार श्री. नितेश राणे, माजी आमदार श्री. राजन तेली, श्री. अतुल काळसेकर उपाध्यक्ष जिल्हा बँक, जिल्हा बँकेचे सर्व संचालक मंडळ व जिल्हयातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्नेहबंध’ सोहळा कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री मनिष दळवी यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स