धनगर समाजातील मेंढपाळांना जमीन खरेदी करण्यासाठी तात्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे आमदार मोनीका राजळेंची विधानसभेत लक्षवेधी सुचना
सहसंपादक/नवलराज काळे : धनगर समाजातील अनेक भुमिहीन मेंढपाळ सहा-सात महीने विस्थापित होउन मेंढीपालनासाठी इतर राज्यात,जिल्ह्यात, जातात.मेंढीपालनासाठी धनगर समाज स्थलांतरित होउ नये म्हणून बंदिस्त अथवा अर्ध बंदिस्त मेंढीपालन करण्यासाठी त्यांना जमीन खरेदी अथवा जमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तात्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे अशी लक्षवेधी सुचना अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली.तसेच स्थलांतरित मेंढपाळांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा. आणि प्रत्येक तालुक्यात लोकर विकास कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षण अथवा यंत्रसामुग्री साठी सरकारी योजने अंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी आम.मोनीका राजळे यांनी केली.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)