एस .टी प्रवास तात्पुरता महागणार ;२० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर परिवर्तनशील भाडेवाढ.
विद्यार्थी पास व इतर पासेसना भाडेवाढीतून वगळले..!
१ नोव्हेंबरपासून तिकिटदर पुन्हा जुन्या दरानेच होणार .
मुंबई | ब्युरो न्यूज : एस.टी.महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यांपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे.त्यानुसार दरवर्षीप्रमाणे यावेळी २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने शुक्रवारी दिली. ही भाडेवाड ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे.
ही भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू असेल. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू नाही, अशी माहिती महामंडळाने दिली. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे , त्या प्रवाशाकडून वाहक आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक वसूल करण्यात येणार आहे. ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास, तसेच मासिक आणि त्रैमासिक तसेच विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेंबरपासून नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जाणार आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)