नाभिक मंडळ बांदा विभागामार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
राकेश परब / बांदा : संतसेना पुण्यतिथी चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ मुंबई-बांदा विभागाच्या वतीने इन्सूली येथील अक्षय चव्हाण यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अक्षय चव्हाण यांच्या आई व वडीलांचे दुख:द निधन झाले होते. या गणेशोत्सव काळात मदत व्हावी या उद्देशाने त्यांना मदत देण्यात आली.तसेच कास येथील गणेश तुकाराम न्हावी यांच्यावर मदुमेह आजारामुळे आजारी आहेत. गणेश व्हावी कुटुंब प्रमुख होते. त्यांना ही जीवनाआवश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले. यावेळी बांदा माजी अध्यक्ष विश्वनाथ शैर्लेकर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, अध्यक्ष बांदा विजय शैर्लेकर उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)