ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मकरंद तोरसकर यांना सामाजिक पुरस्कार प्राप्त

मकरंद तोरसकर यांना सामाजिक पुरस्कार प्राप्त

प्रकाशन: 06 Sep 2021 05:04 PM
वाचन संख्या 99

नॅशनल रुरल डेव्हलमेंट फाउंडेशन ऑर्गनायझेशनच्या वतीने प्राप्त होणार पुरस्कार

राकेश परब / बांदा :नॅशनल रुरल डेव्हलमेंट फाउंडेशन ऑर्गनायझेशन, बेळगावी – हेल्थ अँड नेचर सोसायटी बेळगावी यांच्या मार्फत उत्कृष्ट सामाजिक कार्याचा गौरव करणारा आंतरराज्य पुरस्कार मा.श्री मकरंद विजय तोरसकर ग्रामपंचायत सदस्य बांदा,धी बादा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारिणी सदस्य यांना प्राप्त झाला आहे. स्वर्गीय प्रतापराव तथा आबासाहेब तोरसकर यांच्या प्रेरणेतून आपल्या तोरसकर घराण्याचा सामाजिक कार्याचा वारसा मकरंदभाई तोरसकर यांनी आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याच्या माध्यमातून अखंडीतपणे सुरू ठेवला ही खरोखरच कौतूकाची बाब आहे आणि म्हणूनच कर्नाटक राज्यातून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पोचपावतीच म्हणावी लागेल. मा.मकरंदभाई तोरसकर यांचे बांदा मधुन अभिनंदन होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स