ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरेत मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरेत मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक…!

प्रकाशन: 09 Aug 2022 07:45 PM
वाचन संख्या 76

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे येथे मुस्लिम धर्मियांच्या मोहरम उत्सवाची सांगता मंगळवारी सायंकाळी झाली. मोहरम’ हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. मोहरम निमित्त मसुरे बाजारपेठ येथील रफिक शाह वल्ली मोहल्ला आणि मसुरे भरतगड पायथ्या खालील चिस्ती मोहल्ला येथील ताबूत मिरवणुक काढण्यात आले. ठिकठिकाणी सरबत वाटप करण्यात आले. मसुरे येथील मुख्य बाजारपेठ व मर्डे विठ्ठल मंदिर येथे मुस्लिम धर्मीय बांधवांनी फेर धरत प्रार्थना केली. यावेळी मूनवर सय्यद, यासिन सय्यद, इरफान शेख, अजीजुर चिस्ती, खलील चिस्ती, पपु शेख, जमीर चिस्ती, बिलाल शेख, जुबेर शेख, अन्वर शेख, इकबाल शेख, अब्दुल शेख, इम्तियाज शेख,  रिजवा न शेख, इम्रान शेख, यासिन शेख,  दाऊद शेख, नासिर शेख, कैसर शेख, इल्लू शेख, फैजान शेख, एजाज शेख आदी मसुरे, पेमवडे येथील मुस्लिम बांधव, महिला, हिंदू बांधव उपस्थित होते. मसुरे पोलीस प्रमोद नाईक, विवेक फरांदे, होमगार्ड संजय मोरे यांनी वाहतूक नियोजन केले. कोरोनामुळे मगिलवर्षी साध्या पद्धतीने मोहरम साजरा करण्यात आला होता. निर्बंध नसल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात मुंबईकर मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. उत्सवाची सायंकाळी उशिरा झाली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स