ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कट्टा येथे १० ऑगस्टला जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायत स्पर्धेचे आयोजन..!

कट्टा येथे १० ऑगस्टला जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायत स्पर्धेचे आयोजन..!

प्रकाशन: 04 Aug 2022 01:29 PM
वाचन संख्या 40

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्यावतीने “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १० ऑगस्टला ही स्पर्धा चार गटात होणार आहे.
पहिली ते पाचवी पहिला गट, इयत्ता सहावी ते आठवी दुसरा गट, इयत्ता नववी ते बारावी तिसरा गट व महाविद्यालयीन व खुला असा चौथा गट राहणार आहे. एका गटात सहा ते दहा स्पर्धक (संगीत साथ वगळून ) राहणार आहेत. संगीत साथ आवश्यकता असल्यास आयोजकांमार्फत हार्मोनियम ,तबला इत्यादी साहित्य दिले जाईल. गाण्याची वेळ सहा ते आठ मिनिटे राहील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेच्या नाव नोंदणीची अंतिम तारीख दिनांक ७ ऑगस्ट राहील.
प्रत्येक गटातून विजेता व उपविजेता संघ निवडला जाईल. गट क्रमांक १ विजेता ७५० रुपये, उप विजेता ५५० रुपये, गट क्रमांक 2 विजेता संघ ७५० रुपये व उपविजेता ५५० रुपये, गट क्रमांक 3 विजेता १००० रुपये व उपविजेता संघ ७५० रुपये, गट क्रमांक ४ विजेता संघ १००० रुपये व उपविजेता संघ ७५० रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे. सर्व विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. नाव नोंदणीसाठी संपर्क एस सी पेंडूरकर (9422392790), एस ए चांदरकर, एम एन कवीटकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याध्यापक संजय नाईक यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स