ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ५ ऑगस्टला ओरोस येथे सत्कार..!

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ५ ऑगस्टला ओरोस येथे सत्कार..!

प्रकाशन: 04 Aug 2022 01:24 PM
वाचन संख्या 60

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सिंधुदुर्ग जिल्हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने शुक्रवार ५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १२ वाजता जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यालय ओरोस येथे सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे .
यावेळी पी. के. चौकेकर (सेवानिवृत्त लिपिक, टोपीवाला हायस्कूल मालवण), सायमन फर्नांडिस (एस एम एस स्कूल कणकवली), बाबुराव आरोलकर (सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिरोडा हायस्कूल) व लक्ष्मण आत्माराम पंडित (चतुर्थ श्रेणी कर्मचारी, आर पी डी हायस्कूल सावंतवाडी) हे शिक्षकेतर कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जाधव व सचिव भानुदास परब यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स