ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चव्हाण कुटुंबियाना गोळवण ग्रामस्थांकडून आर्थिक मदत..!

चव्हाण कुटुंबियाना गोळवण ग्रामस्थांकडून आर्थिक मदत..!

प्रकाशन: 10 Jul 2022 10:51 AM
वाचन संख्या 40

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
गोळवण- चव्हाणवाडी येथील श्री. संदिप चव्हाण यांचे दोन महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. संदिप यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. पतीच्या निधनानंतर सदरचे कुटुंब एकाकी असून त्यांना आधार म्हणून गोळवण ग्रामस्थांनी तातडीची मदत ५ हजार रुपये तसेच कट्टा येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ श्री विनित लवू भोजणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संत्री यांजकडे 3 हजार रुपये देऊन स्वरा संदिप चव्हाण हिला शालेय शिक्षणासाठी एक वर्षा साठी दत्तक घेतल्याची माहिती सरपंच सुभाष लाड यांनी दिली. गोळवण ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजनेमधून प्राधान्याने घरकुल देऊन कायमचा आसरा करून दिलेला आहे. सर्व दात्यांचे गोळवण गावचे सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री गावडे ग्रामसेविका सौ. माधवी कामतेकर यांनी आभार मानले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स