ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
झाडे लावा आणि वैश्विक तापमानवाढ थांबवा..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

झाडे लावा आणि वैश्विक तापमानवाढ थांबवा..!

प्रकाशन: 05 Jul 2022 09:46 AM
वाचन संख्या 62

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
देवगड तालुक्यातील मुणगे गावात विविध कृषी संस्थानी एकत्रितपणे वृक्षारोपण करत कृषी दिन साजरा केला. कृषी सहाय्यक श्रीम. व्ही. एस. तिरवडे, मुणगे सरपंच सौ साक्षी गुरवळ, उपसरपंच धर्माजी आडकर, सदस्य सौ अंजली सावंत उपस्थित होते. छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाचे कृषीदूत यांच्या संयुक्त विद्यमाने व ब्रिगेडियर सुधीरजी सावंत (संस्थापक: छ. शि. कृ. म. , किर्लोस) यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड या उपक्रमाअंतर्गत झाडे लावण्यात आली. महाविद्यालयाचा कृषीदूतांनी झाडे लावण्याच्या पद्धतीबदल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मातीची धूप रोखणे व जमिनीतील आद्रता मान्सून पश्चातही टिकून राहावी यासाठी वृक्ष लागवड अत्यंत गरजेची आहे असे मार्गदर्शन केले.
कृषिदूत कु.ओमकार लाड, कु.आयुष खरात, कु.शुभम कुमावत, कु.अभय कुमार गायकवाड, कु.सौरभ सुवारे, कु.आकाश बगाटे, कु.समाधान चोपडे इ. उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स