वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी : फादर ऑल्वीन गोन्साल्वीस.
रोझरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वृक्षारोपणात सहभाग..!
मालवण | नझ़िरा शेख़ : वृक्षलागवड व संवर्धन ही सध्याच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनत चालली आहे. याचाच विचार करता मालवण येथील ‘ रोझरी इंग्लिश स्कूलच्या’ विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीमध्ये उस्फूर्त सहभाग घेतला. या शाळेतील पाचवी ते दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने झाड आणून शाळेच्या आवरातच या झाडांची लागवड केली.
शाळेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्सालवीस व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या निसर्ग जपणुकीसाठी प्रवृत्त केले. शालेय परिपाठावेळी वृक्षांचे महत्त्व या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांना झाडे लावणे व संगोपन करणे हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव करून दिली गेली.
विद्यार्थ्यांनी केलेल्या या कार्याचे फळ भविष्यात त्यांना नक्कीच मिळेल, अशा सदिच्छा व्यक्त केल्या गेल्या.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)