मसुरेच्या संतान फर्नांडिस यांची मालवण मधून बिनविरोध निवड..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या संचालक मंडळावर वाहनचालक संतान फर्नांडिस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पतसंस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात मालवण तालुक्यातून येथील पंचायत समितीतील वाहनचालक व मसुरे गावचे सुपुत्र संतान फर्नांडिस यांची सर्व कर्मचाऱ्यांनी बिनविरोध निवड केली. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी फर्नांडिस यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समितीतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)