ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
यशस्विनी प्रतिष्ठानकडून मुणगेत यशवंतांचा गौरव...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

यशस्विनी प्रतिष्ठानकडून मुणगेत यशवंतांचा गौरव...!

प्रकाशन: 25 Jun 2022 04:03 PM
वाचन संख्या 129

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मुलांच्या उत्कर्षासाठी यशस्विनी प्रतिष्ठान नेहमीच कार्यरत असते. मुणगे गावचे सुपुत्र आनंद मालाडकर यांच्या दातृत्वातून आज मुलांचा गुणगौरव होत आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना आपण सर्वांनी सहकार्याचा हात दिला पाहिजे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन इतर ग्रामस्थ तसेच तुम्ही विद्यार्थी पुढे येणे आवश्यक आहे. बचतगटाना आर्थिक सहकार्य, धान्य वाटप, गरीब कुटुंबांना मदत, वह्या वाटप असे उपक्रम आनंद मालाडकर गावात राबवतात. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या दातृत्वातून पुढील आयुष्यात प्रेरणा घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन श्री भगवती एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त ऊर्फ आबा पुजारे यांनी येथे केले.

Article image
Article image


यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष आनंद मालाडकर यांच्या वतीने श्री भगवती हायस्कुल मुणगे येथे दहावी व बारावी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष आनंद मालाडकर यांनी यापुढील काळात सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले नेहमी सहकार्य राहील असे सांगितले. अभ्यास करून मोठे व्हा, तसेच तुमची वेगळी ओळख निर्माण करा असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, ग्रामपंचायत सदस्य सौ मालाडकर, सौ सावंत, श्रीपाद बागवे, प्रणय महाजन, प्रसाद बागवे, सौ गौरी तवटे, हरीश महाले, अंकित सावंत, एन जि वीरकर, सौ रश्मी कुमठेकर, झुंजार पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी दहावी परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थी यांना स्कुल बॅग व प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थी यांना रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. तसेच वह्या वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचे उपक्रम मुणगे गावात राबविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सरपंच सौ साक्षी गुरव व सर्व सहकाऱ्यांचे मान्यवरांनी कौतुक केले.
यावेळी ज्यू कॉलेजचे शिक्षक प्रणय महाजन यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले. सर्व शिक्षकांचा यावेळी मालाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक मुख्याध्यापिका एम बी कुंज तर सूत्रसंचालन सौ गौरी तवटे, आभार प्रशालेचे शिक्षक प्रसाद बागवे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स