दांडी शाळेच्या विद्यार्थिनीला दत्तक पालक योजनेचा लाभ..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
दांडी शाळेचे माजी विद्यार्थी तथा दांडी शाळा गौरव समिती अध्यक्ष श्री.नारायण धुरी यांनी आपला चिरंजीव कु.आदित्य याच्या सोळाव्या वाढदिवसानिमित्त दांडी शाळेतील एक मुलगी सा.फु.द.पा.योजने अंतर्गत दत्तक घेतली.दांडी शाळा मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण यांजकडे तीन हजार रु.कु.आदित्य यांने सुपुर्द केले.यावेळी दांडी शाळा पदवीधर शिक्षक श्री.शिवराज सावंत,सहाय्यक शिक्षिका सौ.मनिषा ठाकुर,तंत्रस्नेही शिक्षक श्री.रामदास तांबे उपस्थित होते.सदर रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ओरोस येथे कायम स्वरुपी ठेव ठेवण्यात येणार आहे.यापूर्वी दांडी शाळेमध्ये १८ मुली दत्तक घेण्यात आल्या आहेत. १९ वी मुलगी दत्तक घेतल्या बद्दल श्री.नारायण धुरी यांचे दांडी शिक्षकवृंदांतर्फे आभार मानण्यात आले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)