भरतगड इंग्लिश मिडीयमचा दहावीचा १०० टक्के निकाल..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
माता काशीबाई महादेव परब चॅरिटेबल ट्रस्ट मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल मसुरे या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. सृष्टी सुदर्शन मसुरकर (83.60), लॉसन संतान फर्नांडिस (82.20 टक्के), ओम भूषण सावंत (78.00टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
संस्था अध्यक्ष प्रकाश परब, स्कुल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, डॉ. सुधीर मेहंदळे, अशोक मसुरेकर, बाबाजी भोगले, मुख्याध्यापक श्री. किशोर देऊलकर यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कुल कमिटी, पालक व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)