ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ओझर विद्यामंदिर कांदळगावला प्रोजेक्टर भेट ;१९८६-८७ च्या एस एस सी. बॅच कडून गुरुदक्षिणा..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ओझर विद्यामंदिर कांदळगावला प्रोजेक्टर भेट ;१९८६-८७ च्या एस एस सी. बॅच कडून गुरुदक्षिणा..!

प्रकाशन: 13 Jun 2022 06:23 PM
वाचन संख्या 27

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

         मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या माध्यमिक शाळेच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतून१९८६-८७ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला पंचवीस  हजार रुपये किमतीचा स्क्रीनसह एल ई डी प्रोजेक्टर भेट म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री  पी. आर. खोत  यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी बॅचचे प्रतिनिधी म्हणून सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री.सतिश कदम,  ओझर विद्यामंदिर येथे साहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले  श्री. प्रविण पारकर, ओझर येथील हॉटेल व्यावसायिक  संजय ऊर्फ भाऊ कांबळी, सहा. शिक्षक दीपक जाधव,  पी. के. राणे, कर्मचारी भास्कर पाताडे, मधुसूदन परुळेकर उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या या बहुमोल सहकार्याबद्दल संस्थेच्या व शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. पी.आर. खोत यांनी आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे या शैक्षणिक साहित्याचा वापर प्रभावी अध्यापनासाठी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स