मसुरेत पाच फुटी अजगरास जीवदान..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे बाजारपेठ नजीक विश्वनाथ मोरे यांच्या घरानजीक दिसून आलेल्या सुमारे पाच फूट लांबीच्या अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मोरे यांनी अजगर पाहताच मसुरे कावावाडी येथील कोकण वाइल्ड लाइफचे सदस्य सर्पमित्र रमण पेडणेकर यांना याबाबत माहिती दिली. रमण यानी त्वरित धाव घेत अजगरास पकडले. यावेळी त्यांना सतिश मसुरकर, किरण पाटील यांनी सहकार्य केले.पावसाळा सुरू झाला असून कोणत्याही प्रकारचे सरपटणारे जनावर आढळून आल्यास त्याला न मारता संपर्क साधण्याचे आवाहन रमण पेडणेकर यांनी केले आहे. सदर अजगरास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)