उंबर्डे - वैभववाडी मार्गावर सोनाळी येथे भीषण अपघातात बहिण भावाचा मृत्यू…
फरार झालेल्या काँक्रीट मिक्सर वाहन चालकाचा शोध पोलीस घेत आहेत..
वैभववाडी |नवलराज काळे:-
मोटरसायकल व काँक्रीट मिक्सर वाहन यांच्यात झालेल्या अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी सोनाळी नजीक घडली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमित यादव व टीम दाखल झाली आहे. अपघात स्थळावरून मिक्सर वाहन चालक हा फरार झाला आहे. या घटनेत उंबर्डे – वैभववाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
काँक्रीट मिक्सरचे वाहन हे उंबर्डेहून वैभववाडीच्या दिशेने येत होते. दरम्यान कोळपे येथील शालेय विद्यार्थी आपल्या विवाहित बहिणीला वैभववाडी रुग्णालयात डॉक्टरकडे घेऊन येत होता. सोनाळी नजीक मोटरसायकल व काँक्रीट मिक्सर वाहनाच्या धडकेत बहीण भाऊ जागीच ठार झाले आहेत. त्यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने जागीच गतप्राण झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या घटनेची माहिती मिळताच कोळपे, उंबर्डे येथील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले, सोनाळी, कुसूर येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे. फरार झालेल्या चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने कोळपे गावावर शोककळा पसरली आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)