ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
कणकवली तालुक्यातील तळेरे येथिल मेडिकल व्यावसायिकावर चोरिच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवली तालुक्यातील तळेरे येथिल मेडिकल व्यावसायिकावर चोरिच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला..!

प्रकाशन: 09 Jun 2022 10:58 AM
वाचन संख्या 111

पहाटे झालेल्या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे जनतेत घबराट…

हल्ल्यामुळे महामार्ग पुन्हा एकदा हादरला…!

वैभववाडी नवलराज काळे -: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे मुंबई गोवा महामार्गावरील कासार्डे तिठ्ठा ओव्हर ब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक श्री.जगदीश डंबे,रा.कासार्डे जांभळगाव याच्यावर पहाटे पाचच्या सुमारास माॅर्निग वाॅकला गेले असताना कासार्डेहून तळेरेच्या दिशेने जाणा-या लेनवर दुचाकीवरून तीन अज्ञातांकडून चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी करत प्राणघातक हल्ला केला.

Article image

यात श्री. डंबे याच्या नाकावर ठोसा लावत जखमी केले. तर हातातील सोन्याची अंगठी व पैसै हुसकावण्यासाठी पोटात सुरा घुसण्याचा प्रयत्न केला मात्र डंबे यानी प्रतिकार केला तर आरडाओरडा केल्यानतंर दुचाकीवरून आलेले ते तीन इसम सुमारे बत्तीस हजाराचा मोबाईल घेऊन कणकवलीच्या दिशेने पसार झाले.या हल्ल्यात डंबे नाकावर जखम झाल्याने रक्तबंबाळ झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमी डंबे याना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत प्रथमिक उपचार केले. यातनंर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल होत माहिती घेऊन अधिक तपास करीत असून पहाटे झालेल्या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे घबराट निर्माण होत हल्ल्यामुळे महामार्ग पुन्हा एकदा हादरला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स