ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अवधूत महाराज  समाधी मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अवधूत महाराज  समाधी मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात..!

प्रकाशन: 28 May 2022 04:26 PM
वाचन संख्या 40

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

मसुरे देऊळवाडा गावठणवाडी येथील श्री समर्थ अवधूत महाराज  समाधी मंदिराचा कलशारोहण सोहळा  मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मसुरे  गावात शंभर वर्षांपूर्वी श्री अवधूत महाराज हे संत होऊन गेले. त्यांची प्रचिती सर्वदूर पसरली आहे. श्री समर्थ बागवे महाराजांचे ते गुरू होते. रवळनाथ मंदिराच्या बाजूला त्यांनी जिवंत समाधी घेतली होती. 

Article image

अवधूत महाराजांच्या भक्तगणांनी महाराजांच्या समाधी मंदिराचे नूतनीकरण करून नुकताच कलशारोहण सोहळा केला.  या कार्यक्रमाची अग्रपूजा श्री संभाजी हिरोजी वेरलेकर यांच्या हस्ते करण्यात आली. कलश पूजा बटू कुमार रूहान समीर सावंत याच्या हस्ते करण्यात आली. सर्व धार्मिक विधी स्थानिक पुरोहीत विजय जोशी यांच्या अधिपत्याखाली सात वेदचाऱ्यांकरवी करण्यात आले. यावेळी संग्राम प्रभुगावकर, बाबुराव प्रभुगावकर, उद्योजक डॉ. दिपक परब,

साईप्रसाद बागवे, महेश बागवे,  समीर सावंत, सुरेश बागवे, बाबा परब, अनिल बागवे सुनील बागवे, प्रकाश परब, श्रीकृष्ण बागवे, अभिनंदन परब, बाबू परब, चंद्रकांत परब, संजय बागवे, नरेश बागवे, निलेश परब, सुरेश परब, देऊळवाडा ग्रामस्थ गावठणवाडी आणि स्वामी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स