ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुसूरच्या कन्येला दापोली कृषी विद्यापीठाची डाॅक्टरेट पदवी प्रदान…!

कुसूरच्या कन्येला दापोली कृषी विद्यापीठाची डाॅक्टरेट पदवी प्रदान…!

प्रकाशन: 12 May 2022 12:10 PM
वाचन संख्या 105

वैभववाडी | नवलराज काळे : कुसूर येथील संजना सुनील साळुंखे पाटील हिने दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची डाॅक्टरेट पदवी मिळवली. दापोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. वैभववाडी तालुक्यातील कुसुर टेंबवाडी येथे संजना हिचे घर आहे. तिचे वडील गावातच पोस्टमास्तर म्हणून पोस्टात काम करतात .मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या संजनाने आपले बारावीपर्यंतचे शिक्षण तालुक्यात पुर्ण केले.पुढील शिक्षण दापोली विद्यापीठात घेतले.याठिकाणी माती आणि पाणी संवर्धन अभियांत्रिकी विषयात डाॅक्टरेट पदवी प्राप्त केली.नुकतेच दापोली विद्यापीठात पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी दुरदृष्य प्रणालीद्वारे कृषी मंत्री दादाजी भुसे सहभागी झाले होते.तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद उपनिर्देशक डॉ. आर सी अग्रवाल, कुलगुरू डॉ. संजय सावंत,कुलसचिव डॉ. भरत साळवी आदी उपस्थित होते. संजना हिने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स