ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती संघटना वैभववाडी शाखेचा स्नेहमेळावा संपन्न.

जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती संघटना वैभववाडी शाखेचा स्नेहमेळावा संपन्न.

प्रकाशन: 09 Apr 2022 07:01 PM
वाचन संख्या 126

वैभववाडी | नवलराज काळे : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग शिक्षक संघटना शाखा वैभववाडी चा स्नेहमेळावा http://localhost/news/public/uploads/2022 आयोजित करण्यात आला होता या स्नेहमेळाव्यात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. जि. प. शाळा सांगुळवाडी नं .१ च्या पदवीधर आदर्श शिक्षिका सौ. स्नेहलता जगदीश राणे यांना सन २०२१/२२चा जिल्हा परिषद उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला यानिमित्ताने शिक्षक समितीच्या वतीने शाल श्रीफळ सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.व्यासपीठावर तालुका अध्यक्ष श्री. रफिक बोबडे ,सचिव श्री. महादेव शेट्ये ,महिला सेल अध्यक्षा सौ.दिव्या भोसले,सचिव सौ. शोभा पाटील राज्य सल्लागार श्री. सुनील चव्हाण, श्री. संतोष मोरे संचालक ,श्री. संजय पाताडे , श्री. शरद नारकर इ. मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स