वैभववाडी भाजपाच्या वतीने भाजपा स्थापना दिनानिम्मित दिवंगत स्वातंत्र सैनिक शंकर कांबळे यांच्या पत्नीचा सत्कार.
वैभववाडी | नवलराज काळे : भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित स्वातंत्र सैनिक कै.श्री. शंकर कांबळे यांच्या पत्नी श्रीमती यशोदा शंकर कांबळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन भारतीय जनता पार्टी, वैभववाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. नासिर काझी, माजी सभापती बापी मांजरेकर, सभापती सौ. अक्षता डाफळे , वाभवे वैभववाडी नगराध्यक्षा कु. स्नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष श्री. संजय सावंत, भाजपा युवा मोर्चा श्री. किशोर दळवी, शक्ती केंद्र प्रमुख श्री. प्रकाश पाटील, श्री. प्रदीप नारकर, बाळू कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)