शिक्षण प्रसारक सत्यवान यशवंत रेडकर यांनी दिल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा.
मालवण | नझ़िरा शेख़ : भारतातील ‘तिमिरातूनी तेजाकडे’ शिक्षण प्रतिष्ठानचे संस्थापक, प्रमुख मार्गदर्शक आणि शिक्षण प्रसारक श्री सत्यवान यशवंत रेडकर यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र व कोकणातील सर्व विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोना काळ,ऑफलाईन ,ऑनलाईन अशा गोष्टींचा बाऊ न करता शिक्षण,अभ्यास हे सामाजिक कर्तव्य मनाशी राखून तुमचे आजचे अभ्यासप्रयत्न हेच तुमचे भवितव्य आहे या वस्तुनिष्ठतेने परीक्षांना सामोरे जायचा सल्ला त्यांनी सर्व दहावीच्या परिक्षार्थिंना दिला आहे.
शिक्षण प्रसारक असलेले सत्यवान यशवंत रेडकर हे भारत सरकारचे सीमाशुल्क विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी या पदावरही कार्यरत आहेत.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)