मालवणात काॅन्ग्रेसतर्फे महात्मा गांधी यांना आदरांजली..!
सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल,ओ.बि.सी.सेल,युवक काॅन्ग्रेस व मालवण तालुका काॅन्ग्रेसचादेखिल संयुक्त सहभाग.
मालवण | नझ़िरा शेख़ : राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांच्या 74 व्य् पुण्यतिथीनिमित्त सिंधुदुर्ग सेवादल, सिंधुदुर्ग जिल्हा ओ.बी. सी.सेल,जिल्हा युवक काँग्रेस आणि मालवण तालुका युवक काॅन्ग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम अतिशय सात्विक पद्धतीने साजरा करण्यात आला. महात्मा गांधीजीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महात्माजींनी नेतृत्व केले.30 जानेवारी, १९४८ रोजी त्यांची हत्या झाली व हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जाऊ लागला.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना व शहीद क्रांतीकारकांना देखील यावेळी अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभातफेरीचे देखील आयोजन करण्यात आले. “गांधीजींचे आचार विचार संपूर्ण जगात आदराने मांडले जातात आणि गांधी अतीत नाही तर भविष्यदेखील आहेत”, असे एकमुखी प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमाला जिल्हा सेवादल अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण तळवडेकर, ओ.बी.सी जिल्हाध्यक्ष श्री महेश अंधारी, मालवण तालुका श्री. मेघनाथ धुरी, जिल्हा युवक काॅन्ग्रेसचे देवानंद लुडबे, पल्लवी तारी, गणेश पाडगांवकर , शहर उपाध्यक्ष सरदार ताजर, बबन तळवडेकर,पराग माणगांवकर,विरेश तळवडेकर, अरुण लोके,महेंद्र मांजरेकर,संकेत चव्हाण,उमेश देऊलकर,विश्वनाथ शिंगरे,उत्तम देऊलकर,महेंद्र तळावडेकर ,वैष्णवी तळावडेकर,योगेश कुर्ले, हेमंत तळावडेकर,हेमंत कांदळकर,भाई चव्हाण,बबन गांवकर,दिलिप तळगांवकर, शेख आदी काॅन्ग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)