ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांद्यातील ओंकार नगरात माळरानावर भीषण आग...!

बांद्यातील ओंकार नगरात माळरानावर भीषण आग...!

प्रकाशन: 07 Jan 2022 03:48 PM
वाचन संख्या 93

५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू बागायत जळून खाक

बांदा |राकेश परब :बांदा ओंकार नगर येथे आज माळरानावर भीषण अग्नितांडाव होऊन सुमारे ५ एकर क्षेत्रातील आंबा, काजू बागायत जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे ५ लाखाहून अधिक नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा न झाल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.


ही घटना काल दुपारी घडली. यामध्ये विवेक खेमराज गावकर यांच्या बागेतील १०० आंबा कलमे, २०० काजू कलमे तसेच इतर फळझाडे व बागायतीत पाण्यासाठी टाकण्यात आलेली जलवहिनी जळून खाक झाली. दुपारची वेळ असल्याने व वारा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत ५ एकर क्षेत्रातील बागायत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
येथील मकरंद तोरसकर, मंदार कल्याणकर यांचेही नुकसान झाले. मात्र गांवकर यांना सर्वाधिक नुकसानीस सामोरे जावे लागले. अतिशय भीषण अशा आगीमळे बांदा परिसर हादरुन गेला आहे..!

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स