ठाणे येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या कोकण विभागाची बैठक संपन्न.
ठाणे येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या कोकण विभागाची बैठक संपन्न.
व्हाॅईस ऑफ मिडिया, सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
आगामी कोकण विभागीय अधिवेशनाच्या प्राथमिक आराखड्यासह संघटनात्मक विस्तार, नियोजन आणि विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा.
ब्यूरो न्यूज : ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात आज ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या कोकण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकिला व्हाॅईस ऑफ मिडिया, सिंधुदुर्ग चे सर्वंकष जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर, राज्य सहसंघटक समिर म्हाडेश्वर, महिला विंगच्या सदस्य रेवती वालावलकर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. या बैठकीत आगामी कोकण विभागीय अधिवेशनाच्या प्राथमिक आराखड्यासह संघटनात्मक विस्तार, नियोजन आणि विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान कोकण विभागाचे शिक्षक आमदार यांनी आवर्जून बैठकस्थळी उपस्थित राहून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली आणि संघटनेच्या आगामी उपक्रमांसाठी आवश्यक ते सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यानंतर भिवंडीचे खासदार बाळ्या मामा तथा सुरेश म्हात्रे यांनीही बैठकीस शुभेच्छा देत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांना आपला पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनीही आवश्यक ती मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कोकण विभागीय अधिवेशन अधिक व्यापक आणि प्रभावी पद्धतीने आयोजित करण्यासाठी बैठकीत विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला. कोकण विभागातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
सौजन्य | ठाणे ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)