ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन ७ जानेवारी रोजी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन ७ जानेवारी रोजी.

प्रकाशन: 31 Dec 2025 11:13 PM
वाचन संख्या 105

जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन ७ जानेवारी रोजी. 


जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली तारकर्ली येथे संपन्न होणारा कार्यक्रम.


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन बुधवार, ७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन सिंधुदुर्ग वाचन मंदिर, तारकर्ली आणि अखिल तारकर्ली ग्राम विकास मंडळ, मुंबई (तारकर्ली) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लू हेवन रिसॉर्ट, तारकर्ली येथे संपन्न होणार आहे.


अधिवेशनाच्या प्रथम सत्रात सकाळी ९:३० ते १० श्री महापुरुष मंदिर, तारकर्ली ते ब्लू हेवन रिसॉर्ट अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १०:३० प्रतिनिधी नोंदणी, परिचय व अल्पोपहार होईल. सकाळी १०:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप जनार्दन ढवळ उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, तारकर्ली सरपंच सौ. मृणाली मयेकर, तर स्वागताध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग वाचन मंदिर, तारकर्ली अध्यक्ष कांचन खराडे यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


द्वितीय सत्रात दुपारी २ ते ३:३० वाजता ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकारी तसेच डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कूल, देवबाग यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून यामध्ये दशावतार, नाट्य अभिवाचन, प्रहसन व समूह नृत्ये यांचा समावेश असेल. दुपारी ३:३० ते ४:३० वाजता होणाऱ्या खुल्या अधिवेशनात ग्रंथालयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या खुल्या अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिन हजारे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सिंधुदुर्ग) मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाची सांगता पसायदानाने होणार आहे.


या वार्षिक अधिवेशनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स