ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनातील १५ ठराव तातडीने मंजूर करण्याची मागणी.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनातील १५ ठराव तातडीने मंजूर करण्याची मागणी.

प्रकाशन: 19 Nov 2025 02:50 PM
वाचन संख्या 130

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्य शिखर अधिवेशनातील १५ ठराव तातडीने मंजूर करण्याची मागणी.


दोन दिवसीय अधिवेशनाला संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह मान्यवर आणि राज्यातून दोन हजारांहून अधिक पत्रकार उपस्थित.

Article image


मुंबई | ब्यूरो न्यूज : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ – ‘व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम’चे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन पंढरपूर येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाले. राज्यभरातून तब्बल दोन हजारांहून अधिक पत्रकारांनी उपस्थित राहून दोन दिवसीय अधिवेशनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

Article image

व्हॉईस ऑफ मीडिया’ संस्थापक अध्यक्ष श्री. संदीप काळे


या अधिवेशनात पत्रकारांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि सुदृढ पत्रकारितेसाठी एकूण १५ ठराव अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आले. हे सर्व ठराव राज्य सरकारने तातडीने मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरतील, असा तीव्र इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला.


अधिवेशनात पत्रकारांचे किमान वेतन शासनाने निश्चित करून त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी, पत्रकार सुरक्षा कायदा अधिक कडक करावा आणि जिल्हा-तालुका पातळीवर पत्रकार संरक्षण अधिकारी नेमावेत, अशा मागण्यांना प्राधान्य देण्यात आले. सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी १० लाखांचा आरोग्य विमा आणि २५ लाखांचा अपघात विमा अनिवार्य करावा, पत्रकार निवृत्तीवेतन योजना लागू करावी आणि सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये पत्रकारांसाठी २% राखीव कोटा देण्यात यावा, असे ठरावही संमत करण्यात आले. जिल्ह्यातील प्रेस - क्लब्जचे आधुनिकीकरण, माहिती खात्यात ‘मीडिया सपोर्ट सेल’ स्थापन करणे, राज्यस्तरीय पत्रकार प्रशिक्षण अकादमी उभारणे, पत्रकार अधिवेशनांना सरकारी आर्थिक सहाय्य, न्यूज-पोर्टल नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आणि पत्रकारांवरील खोटे खटले मागे घेण्यासाठी विशेष समिती स्थापणे, या ठरावांनाही व्यापक पाठिंबा मिळाला.


आपत्तीग्रस्त पत्रकारांसाठी तात्काळ मदत निधी, महिला पत्रकारांसाठी सुरक्षित निवास, प्रवास भत्ता, मातृत्व रजा, क्रेच सुविधा आणि लैंगिक छळ प्रतिबंधासाठी कडक यंत्रणा लागू करावी, असा ठरावही अधिवेशनात मंजूर करण्यात आला. तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विशेष पत्रकार सन्मान व गौरव योजना सुरू करण्याचाही ठराव एकमुखी पारित झाला.


अधिवेशनात पारित केलेले सर्व १५ ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंत्रिमंडळाला प्रत्यक्ष भेटून सादर करण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले. तसेच सर्व पालकमंत्र्यांनाही स्थानिक पातळीवर भेटून मागण्यांचे स्मरण करून देण्यात येईल. सरकारने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल, असा इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, सर्व राज्य पदाधिकारी, सर्व राज्य कोर टीम यांनी दिला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स