पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडणार आहे. हा समारंभ शुक्रवार दि. १५ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजुन ५ मिनिटांनी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. या ध्वजारोहणानंतर सकाळी ९ वाजून ५ मिनिटे ते ९ वाजून १५ मिनिटे, पोलीस दल, राज्य राखीव दल व होमगार्ड यांची संयुक्त मानवंदना होणार आहे. तरी या समारंभाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

तसेच मुख्य शासकीय समारंभ सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी असल्यामुळे इतर कार्यालये आणि संस्थांनी त्यांच्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी ८. ३५ च्या पुर्वी किंवा सकाळी ९. ३५ नंतर करण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)