‘रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट ‘आयोजीत स्नेहसंमेलन व थीम डिनरप्रसंगी केले मार्गदर्शन .
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्गातील तरुणांनी आपल्या जिल्हातील परंपरा, संस्कृती जगातील प्रत्येक कानाकोप-यात पोहाचवण्यास पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी येथे केले.
रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट आयोजीत स्नेहसंमेलन व थीम डिनर “हेलोवीन ट्रिक ऑर ट्रिट” कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तृतीय वर्ष वी एस सी (हॉस्पीटॅलीटी स्टडीज ) मुलांना . मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत “इव्हेंट मॅनेजमेंट” विषयासाठी एखादया कार्यक्रमासाठी आयोजन करायचे असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यकमांस पद्मश्री परशुराम गंगावणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक जानवली गावच्या सरपंच सौ शुभदा राणे, श्री चेतन परशुराम गंगावणे, रिगल संस्थेचे अध्यक्ष श्री संजयजी शिर्के, रिगल संस्थेच्या संचालक डॉ . सौ . सुमिता शिर्के मॅडम, हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्राचार्य श्री पुरुषोत्तम आरोलकर, कॉम्प्युटर विभागाच्या प्राचार्या तृप्ती मोंडकर आदी मान्यवरदेखील उपस्थित होते.
पिंगुळी येथील कोकणातील संस्कृती तिचे जतन करण्याची गरज व पिंगुळी येथील कलादालन याबद्दल त्यांनी माहिती दिली. डॉ. आशिष नाईक यांनी विद्यार्थ्याना ध्येय डोळयासमोर ठेऊन वाटचाल करण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. मधुरा सावंत यांनी केले तर आभार प्रा. शैलेश गावडे यांनी मानले.