27.8 C
Mālvan
Monday, December 2, 2024
IMG-20240531-WA0007

अभिनेते अतुल परचुरे कालवश.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्युरो न्यूज : मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील चतुरस्त्र अभिनेता अतुल परचुरे यांचं निधन झाले. अभिनय क्षेत्र व विविध क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे. सुप्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक तथा नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांचे ते पती होत.

अतुल परचुरे यांनी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा मालिकांमध्ये हुबेहुब साकारली होती. अतुल परचुरे यांचं नातीगोती हे नाटक चांगलंच गाजलं होतं. यावेळी त्यांच्याबरोबर दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू असे कलाकार होते. अनेक मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘वासूची सासु’, ‘प्रियतमा’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह – अभिनेता म्हणूनही काम केलं. ‘सलाम-ए-इश्क’, ‘पार्टनर’, ‘ऑल द बेस्ट: फन बिगिन्स’, ‘खट्टा मीठा’, ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हा अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा ठरला.

अतुल परचुरे त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात फिरण्यासाठी गेले होते. या सुट्टी दरम्यान त्यांची भूक मंदावली होती. काहीतरी गडबड असल्याची त्यांना जाणीव झाली होती. यावर उपाय म्हणून त्यांनी काही औषधेही घेतली, परंतु त्याचा काहीच फायदा होत नव्हता. भारतात परतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. त्यावेळी त्यांच्या पोटात ट्यूमर सापडला आणि त्यात कॅन्सर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होतं. यातून ते बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी त्यांना दिला. परंतु उपचारादरम्यान त्यांची तब्येत आणखी बिघडत गेली आणि शस्त्रक्रियेलाही विलंब झाला. कॅन्सर झाल्याचं कळल्यानंतर पहिले उपचारच चुकले होते. त्यांच्या पँक्रियाला बाधा झाली आणि अडचणीत वाढ झाली. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडत गेली. त्यांना चालताना, बोलताना त्रास होत असताना त्यांना डॉक्टरांनी दिड महिने प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रिया करण्यात अनेक अडथळे असल्याचं त्यातून परिस्थिती आणखी बिघडू शकते असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर योग्य उपचारांना सुरूवात झाली आणि केमोथेरपी केली. या काळात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांना साथ दिली. योग्य उपचारानंतर अतुल परचुरे पूर्णपणे बरे झाले. अलिकडच्या काळात त्यांना कोणताही त्रास होत नव्हता मात्र आज त्यांचे निधन झाले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्युरो न्यूज : मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील चतुरस्त्र अभिनेता अतुल परचुरे यांचं निधन झाले. अभिनय क्षेत्र व विविध क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त होत आहे. सुप्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक तथा नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांचे ते पती होत.

अतुल परचुरे यांनी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा मालिकांमध्ये हुबेहुब साकारली होती. अतुल परचुरे यांचं नातीगोती हे नाटक चांगलंच गाजलं होतं. यावेळी त्यांच्याबरोबर दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू असे कलाकार होते. अनेक मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'वासूची सासु', 'प्रियतमा', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह - अभिनेता म्हणूनही काम केलं. 'सलाम-ए-इश्क', 'पार्टनर', 'ऑल द बेस्ट: फन बिगिन्स', 'खट्टा मीठा', 'बुढ्ढा होगा तेरा बाप' अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय 'जागो मोहन प्यारे' मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हा अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा ठरला.

अतुल परचुरे त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात फिरण्यासाठी गेले होते. या सुट्टी दरम्यान त्यांची भूक मंदावली होती. काहीतरी गडबड असल्याची त्यांना जाणीव झाली होती. यावर उपाय म्हणून त्यांनी काही औषधेही घेतली, परंतु त्याचा काहीच फायदा होत नव्हता. भारतात परतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. त्यावेळी त्यांच्या पोटात ट्यूमर सापडला आणि त्यात कॅन्सर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होतं. यातून ते बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी त्यांना दिला. परंतु उपचारादरम्यान त्यांची तब्येत आणखी बिघडत गेली आणि शस्त्रक्रियेलाही विलंब झाला. कॅन्सर झाल्याचं कळल्यानंतर पहिले उपचारच चुकले होते. त्यांच्या पँक्रियाला बाधा झाली आणि अडचणीत वाढ झाली. चुकीच्या उपचाराने प्रकृती बिघडत गेली. त्यांना चालताना, बोलताना त्रास होत असताना त्यांना डॉक्टरांनी दिड महिने प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रिया करण्यात अनेक अडथळे असल्याचं त्यातून परिस्थिती आणखी बिघडू शकते असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर योग्य उपचारांना सुरूवात झाली आणि केमोथेरपी केली. या काळात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने त्यांना साथ दिली. योग्य उपचारानंतर अतुल परचुरे पूर्णपणे बरे झाले. अलिकडच्या काळात त्यांना कोणताही त्रास होत नव्हता मात्र आज त्यांचे निधन झाले.

error: Content is protected !!