मालवण | प्रतिनिधी : २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार्या विधानसभा २०२० निवडणूकीच्या मतदान कालावधीत मतदान केंद्रांपासून १०० मीटरच्या परिसरातील सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी जारी करण्यात आले असल्याची सूचना मालवण पोलिसांनी दिल्या आहेत.
मतनान शांततेत पार पडावे, मतदान कालावधीत सर्व मतदार केंद्रांच्या १०० मीटरच्या आतील आस्थापने चालू राह्यल्यास तिथे विविध पक्षाचे कार्यकर्ते व समाजकंटक यांच्यात यांच्यात वाद होऊन त्यातून कायदा सुव्यवस्था बाधित होऊ शकते. त्यामुळे मतदान केंद्राजवळ सार्वजनिक शांतता निर्माण होऊन मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते.
मतदान सुरु होऊन संपेपर्यंत सर्व मतदान केंद्रा पासून १०० मीटरच्या परिसरातील सर्व आस्थापने बंद ठेवून व्यापारी, व्यावसायिक व मालवणच्या नागरीकांशी सहकार्य करावे व लोकशाहीची सर्वोच्च निवड प्रक्रिया सुरळीत पणे पार पडावी असे आवाहन मालवण पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी केले आहे.